Coronaवर सामूहिक उपाययोजना | ''मनःस्थिती बदला, परिस्थिती बदलेल'' | Shri Pralhad Wamanrao Pai

2021-08-24 0

जगातील प्रत्येक व्यक्तीचे मन भीतीने ग्रासलेले आहे ते कोरोना विषाणूमुळे!
आपला धर्म, जात, भाषा, प्रांत व पंथ हे सारे विसरून जगातील सर्व देश या जागतिक आपत्तीविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आलेले आहेत. खरेतर आपण सर्वजण परस्परांवर अवलंबून आहोत. सद्गुरू श्री. वामनराव पै यांनी निर्माण केलेले जीवनविद्येचे तत्त्वज्ञान म्हणते, "आपण एकटे सुखी होऊ शकत नाही. सर्व सुखी तर आपण सुखी, सर्वजण आरोग्यसंपन्न तरच आपण आरोग्यसंपन्न." कारण It is not only my life; it is our life ही गोष्ट सर्वांना आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. म्हणूनच तर आर्थिक महासत्ता असलेल्या देशापासून ते सर्व विकसनशिल देश या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आले आहेत.
या संकटजन्य परिस्थितीला कारण आपणच आहोत; त्यामुळे यातून मार्ग काढण्याची जबाबदारीही आपली म्हणजेच समस्त मानवजातीची आहे.

आज समाजातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, देशाची शासनव्यवस्था या परिस्थितीला तोंड देण्यासाठी झगडत आहे; परंतु या संकटाला केवळ बाहेरून तोंड देऊन उपयोग नाही तर आतूनही या परिस्थितीवर मात करणे आवश्यक आहे.
सद्गुरु श्री. वामनराव पै सांगतात, मन:स्थिती बदला म्हणजे परिस्थिती सुधारेल. " बाहेरून तोंड देण्यासाठी आज सर्व यंत्रणा कार्यरत आहेतच; पण आपली मन:स्थिती बदलण्यासाठी अजूनही कुणी सज्ज नाही. किंबहुना याचा विचारदेखील कुणी करीत नाही.

सर्वजण विषाणू मारण्यासाठी सॅनीटायझर्सचा वापर करीत आहेत. पण आपल्या मनातही भीतीचा, नकारात्मक विचारांचा जो विषाणू लपलेला आहे त्याची कुणाला चाहूलही नाही. म्हणूनच आज गरज आहे ती हाताच्या सॅनीटायझर सोबतच मनाचा सॅनीटायझर वापरण्याची.
हा केवळ तुमच्या मनातील नकारात्मक विचारांचे विषाणू नष्ट करणारा सॅनीटायझर नसून तुमच्या मनातून थेट जगापर्यंत सुंदर, सकारात्मक विचारतरंग घेऊन जाणारा सॅनीटायझर आहे. संपूर्ण जगाच्या सामूहिक अंतर्मनाच्या शक्तीला एका दिव्य, सकारात्मक विचारासाठी एकत्र आणणारा सॅनीटायझर आहे. तेव्हा मनाचा सॅनीटायझर कोणता, हे या व्हिडिओतून नक्की जाणून घ्या.


#Lokmatbhakti #pralhadpai #jeevanvidya #coronavirus
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा